रत्नागिरी : रत्नागिरी राजापूर तालुक्यातील झर्ये येथील पाझर तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तलावाच्या भिंतीच्या खालूनच मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. नावेरी नदी किनाऱ्यावरवरील चार गावांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. यामध्ये राजपुरमधील झर्ये, लांज्यामधील कुरंग, कोंडगे आणि रिंगणे गावांचा समावेश आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


24 नोव्हेंबर 2017 रोजी या पाझर तलावाचे भूमिपूजन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. तब्बल एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून हा पाझर तलाव बांधण्यात आलाय मात्र या तलावाला लागलेल्या गळतीमुळे हा खर्च वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.