कोकणातही पासपोर्ट कार्यालय सुरू
रत्नागिरी : कोकणवासीयांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोकणातल्या लोकांना आता पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आता कोकणातच राजापूरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू झालंय. राजापूर पोस्ट कार्यालयात पालकमंत्री रवींद्र वायकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पासपोर्ट सेवेचं उद्घाटन झालं.
चाचण्या यशस्वी
दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या दोन्ही विमानतळांवर विमानाच्या लॅण्डिंग आणि टेकऑफच्या चाचण्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे लवकरच या दोन्ही विमानतळांवर खासगी कंपनीच्या विमान सेवा सुरु केल्या जातील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.