Ratnagiri Unhaware Hot Water Springs : महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ कोकणात आहेत. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो अंथाग सुमद्र किनारा आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्य. याच कोकणात नैसर्गिक चमत्कार असणारे आणि विज्ञाला आव्हान देणारे ठिकाण आहे. हा चमत्कार म्हणजे गरम पाण्याचे झरे. गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले कोणणातील हे पर्यटनस्थळ राजापूर तालुक्यात आहे. धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात. 


हे देखील वाचा.... ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणताील रत्नागिरी जिल्ह्य़ात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.  मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर उन्हाळे गाव आहे. याच गावात गरम पाण्याचे झरे आहेत. हे ठिकाण गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध असले तरी तितकेसे लोकप्रिय नाही. उन्हाळे गावात शिरण्यापूर्वी शिवमंदिर असून या मंदिर परिसरातच गरम  पाण्याचे झरे आहेत. मंदिर परिसरात असलेल्या गोमुखातून 24 तास धारा वाहते. तर, जमिनीतून उकळते पाण्याचे झरे वाहतात. या गरम पाण्यातील झऱ्याचे पाणी हे त्वचारोगनाशक असल्याची येथे येणाऱ्या भक्तांची भावना आहे.


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल


उन्हाळे हे राजापूर तालुक्यातील गाव आहे. गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाला धार्मिक महत्व आहे.  या गावात महालक्ष्मीचं प्रसिध्द मंदिर आहे. देवीच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाल्याची अख्यायिका आहे. येथे  12 महिने प्रवाहित असणारे गरम पाण्याचे झरे आहेत. राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे-छोटे गरम पाण्याचे कुंड आहेत. उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे. या कुंडात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत. 


हे देखील वाचा... 7000 कोटींची FD, भारतातील सर्वात श्रीमंत गाव, रुपयामध्ये नाही तर डॉलरमध्ये पैसा कमावतात; यांचा व्यवसाय काय?


हे ठिकाण गंगा तीर्थ नावाने देखील ओळखले जाते. येथील पाण्याचे तापमान  42.8 अंश आहे. या पाण्यात सल्फरचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचे औषधी मूल्य असल्याचे मानले जाते. त्वचा आणि सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी या पाण्यात आंघोळ केल्यास फायदा होतो. अर्जुना नदीच्या तीरावर असलेले उन्हाळे हे गाव अतिशय निसर्गरम्य आहे.  हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणात मन प्रसन्न होते. या गरम पाण्याच्या झऱ्यापासून 300 मीटर अंतरावर श्री. स्वामी समर्थ महाराजांचा मठदेखील आहे.