रत्नागिरी :  लांजा तालुक्यातल्या आमसभेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून जोरदार राडा झाला. आमदार राजन साळवींच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या आमसभेत नागरिकांसह सर्वपक्षीय सहभागी झाले होते.. यावेळी रस्त्यावरून शिवसेना विरुद्ध अन्य विरोधक असं चित्र यावेळी पहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून हा राडा झाला.


चर्चेचे रूपांतर राड्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लांजा राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज लांज्यामध्ये आमसभा आयोजिक करण्यात आली होती. लांज्यामधील नागरिकांसह शिवसेना भाजप, राष्ट्रवादी, कँग्रेस आणि स्वाभिमान पक्ष यांचे अनेक कार्यकर्ते या आमसभेला उपस्थित होते. दरम्यानं वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या रस्त्यांचा विषय निघाला. हा विषय वाढला आणि त्याचे रुपांतर बाचाबाची आणि राड्यात झाले. शिवसेना विरुद्ध अन्य विरोधक असं चित्र यावेळी पहायला मिळालं.


विरोधकांनी केला सभात्याग 


शिवसेनेच्या कार्यकत्यांबरोबर विरोधकांची हमरी तुमरी झाली. जवळपास एक तास हा राडा सुरु होता. त्यामुळे संपुर्ण वातावरण तणावपूर्ण झाले होते.  यावेळी विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार तोंडसुख घेतले. आमदार राजन साळवी हे देखिल यावेळी हतबल झालेले पहायला मिळाले. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर हा राडा शमला. आज संपुर्ण दिवसभर लांजा तालुक्यात या राड्याची चर्चा सुरु होती.