जयेश जगड, अकोला : मागील विधानसभेत शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 नोव्हेंबर पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू आणि त्यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाल्यास पहिले केंद्रीय मंत्री नंतर राज्य मंत्र्यांचे आणि चुकीचे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांचे कपडे आम्ही फाडु असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज अकोल्यात केलो आहे. 


रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, ओला दुष्काळग्रस्त भागात दौरा केलेल्या नेत्यांचे फक्त फोटो सेशन झाले. राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेलं पेकेज तोकडं असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याबाबत शरद पवार यांना आठवण करून दिली आणि राजू शेट्टी यांना आमदारकी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 


रविकांत तुपकर हे सध्या पश्चिम विदर्भाच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत.