प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसंग्राम (Shivsangram) पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे मुंबईकडे येत असताना अपघाती निधन झालं. रविवारी पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांचे अपघाती निधन झालं (Vinayak Mete dies in car accident). विनायक मेटे यांच्या निधनाने कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निधनानंतर मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनांनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात, मेटेंचं निधन यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अपघातानंतर त्यांना कोणी मदत केली माही असा आरोप त्यांच्या कार्यकत्यांनी केला. 


मात्र हा अपघात होण्यापूर्वीच विनायक मेटे यांना त्यांच्या कुटुंबियांनी हा प्रवास टाळण्यास सांगितले होते. मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी नियोजित बीड मधील कार्यक्रम सोडून विनायक मेटे मुंबईला येत होते. पोलीस दलातील सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकाला सोबत घेऊन मेटे मुंबईच्या दिशेने निघाले. 


बीड मधील मेटे यांच्या निवासस्थानाहून निघाल्यावर त्यांच्या गाडीखाली कुत्र्याचा अपघात झाला. हा अशुभ संकेत आहे त्यामुळे  त्यांनी मुंबईला जाऊ नये असा आग्रह घरच्या सदस्यांनी धरला. मात्र तरीही  विनायक मेटे महत्वाची बैठक असल्याने मुंबईला निघाले आणि त्यानंतर विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 


विनायक मेटे यांनी दुर्लक्ष केले


दरम्यान, जर त्या घटनेकडे विनायक मेटे यांनी दुर्लक्ष केलं नसतं तर, त्यांचा जीव वाचला असता असे मत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी वक्त केले. पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली.