चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, प्रतिनिधी, मुरबाड : धसई...10 महिन्यांपूर्वी देशातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून नावारुपाला आलं होतं. मात्र या गावाची सध्याची स्थिती काय आहे याचा रियलिटी चेक झी २४ तासनं केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा महिन्यांपूर्वी धसई गावातल्या दुकानातून अर्थमंत्र्यांनी देशातल्या कॅशलेस व्यवहाराची सुरुवात केली होती. मात्र नव्याच्या नवलाईसारखं एक-दोन महिने गावक-यांनी कार्डचा वापर केला. आता ९० टक्के व्यवहार हे रोखीनं सुरू असल्याचं चित्र आहे. काही खातेदारांना अजूनही कार्ड मिळाले नसल्यानं कॅशलेस व्यवहार वाढू शकले नसल्याचं दिसून येतंय.


शिक्षक आणि नोकरवर्गाकडे फक्त कार्ड आहेत मात्र शेतकरी वर्गाकडून कार्ड्सचा वापर होताना दिसत नाही. तर दुसरीकडे इंटरनेट समस्या, नोटबंदी, आणि आता खिशात असलेली रोख रक्कम यामुळे रोखीनं व्यवहार होत असल्याचं दुकानदार सांगतायत.


वैद्यकीय शुल्क कमी असल्यानं दवाखान्यामध्येही कार्डचा वापर होत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. फळ विक्रेते असो की भाजीपाला विक्रेते यांना तर कॅशलेस म्हणजे नेमकं काय हेच कळलेलं नाही. तर असं आहे देशातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलेल्या धसई गावाचं वास्तव... कॅशलेस व्यवहार होण्यासाठी आणखी जनजागृती होण्याची खरोखरीच गरज आहे.