प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मतदार संघांपैकी चार ठिकाणी महायुतीच्या इच्छुकांनी बंडखोरी केलीय. त्याचा फटका काही अंशी का असेना महायुतीला बसेल. मात्र महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा मतदार संघात बंडखोरी झालीय तर नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मतदारसंघात नागेश पाडवी यांनी बंडखोरी करत सेनेच्या आमश्या पाडवीचा मार्ग अवघड केलाय. या बंडखोरीमुळे महायुतीला मतं विभाजनाचा फटका बसू शकतो. 



गिरीश महाजन महायुतीचाच दणदणीत विजय होईल असा विश्वास व्यक्त करतायत. मात्र साक्री, शिरपूर आणि अक्कलकुवा या मतदार संघातील बंडखोरी महायुतीसाठी निश्चितच सोपी नाही. त्यात धुळे शहरात एमआयएमचे उमेदवार जय पराजयाची गणित बदलू शकतो.   
गिरीश महाजन, जयकुमार रावल महायुतीच विजयी होईल असं सांगत असले तरी येणाऱ्या दिवसात मतदारराजा कुठल्या मुद्यावर कुणाला साथ देईल हे आज सांगता येत नाही. मात्र एक निश्चित आहे महायुतीत सर्व काही आलबेल नसलं तरी आघाडीतही ताळमेळ दिसत नाही.