सांगली : कोकणातील महाड (Mahad Flood) आणि चिपळूण (Chiplun Flood) तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) आणि आसपासच्या भागात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. दरम्यान आता पाणी ओसरल्यानंतर जबाबदार नेतेमंडळींसह मुख्यंमत्र्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करुन मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आता उर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी घोषणा केली आहे. पूरबाधित भागात  वीजबिलाची (Light Bill) वसूली करण्यास नितीन राऊत यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेला किंचीतसा पण दिलासा जरुर मिळाला आहे. (recovery of electricity bill in flood prone areas in maharashtra are Postponement announce Energy Minister Nitin Raut)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत काय म्हणाले?


पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करु नका, असे आदेशच नितीन राऊत यांनी दिले आहेत. ते सांगलीत बोलत होते. यावेळेस त्यांनी ही घोषणा केली.  तसेच पूरग्रस्त भागातील जीवनमान पूर्वपदावर आल्यानंतर बिल भरण्यासाठी काही प्रमाणात सवलतही दिली जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. 


पूरग्रस्तांना बिलमाफी मिळणार का?  


पूरग्रस्ताचं पुरात मोठं नुकसान झालंय. त्यांच्याकडे परिधान करण्यासाठी कपडेही नाहीत. पाणी ओसरल्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून त्यांना मदत केली जात आहे. त्यामुळे या पूरग्रस्ताचं विजमाफी करण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे. "बिलमाफी करायची की नाही, हे मंत्रिमंडळ ठरवेल, मी नाही", असंही राऊत यांनी नमूद केलं.