अंबरनाथ : अंबरनाथ पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा छडा लावलाय. या गुन्ह्याच्या तपासात देशात पहिल्यांदाच 'थ्री डायमेन्शन सुपर इम्पोझिशन' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. एप्रिल २००८ मध्ये अंबरनाथच्या जावसई डोंगरावर एप्रिल महिन्यात शीर कापलेला एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचं शीर सापडलं होतं. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटवणं आणि या गुन्ह्याचा तपास करणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी  यात पोलिसांनी केईएम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर हरीश पाठक यांची मदत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'थ्री डायमेंशन' तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांनी एका काल्पनिक चेहरा तयार केला. या चेहऱ्याचा अंदाजा घेऊन पोलिसांनी एक काल्पनिक चेहरा तयार केला. त्यानंतर हा मृतदेह सायन कोळीवाडा भागात राहणाऱ्या बिंद्रेश प्रजापती यांचा असल्याचं समोर आलं. 


वाहन चालक असलेल्या बिंद्रेशबद्दल पत्नी सावित्री हिनं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला... कसून तपास केला असता सावित्रीनं प्रियकर किसनकुमार कनोजिया याच्यासाठी पतीचा खून केल्याची कबुली दिली. 


पोलिसांनी सावित्री आणि कनोजिया या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा सगळा तपशील समोर आला.