सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : माहुर येथील रेणुकामाता, दत्तशिखर आणि अनुसयागड हे तिन्ही गड रोप वेने जोडले जाणार आहेत. तीर्थक्षेत्र असलेले तीन गड रोप वेने जोडले जाणार असल्याचा हा राज्यातील पहिलाचा प्रयोग ठरणार आहे. येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या माहुर गडाच्या शेजारील गडावर दत्तप्रभुंचं निद्रास्थान असलेलं दत्तशिखर मंदीर आहे. तर त्याच्या बाजूच्या गडावर अनुसयामातेचं मंदीर आहे. हे तिन्ही देवस्थान अतिशय उंचावर असल्याने वयोवृद्ध आणि दिव्यांग भक्तांना दर्शनासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत होते. भक्तांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या तिन्ही गडांना रोप वेने जोडण्याची कल्पना मांडली आणि त्यासाठी त्यांनी 70 कोटी रुपयेदेखील मंजूर करुन घेतले. रोपवेबरोबरच गडासाठी सरकता जिनाही तयार केला जाणार आहे. येत्या महिनाभरात या कामाला सुरूवात होईल.


आता रोप वेने तिन्ही गड जोडले जाणार असल्यानं भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. अशाप्रकारे रोप वेनं तीन गडावरील मंदीरं जोडण्याचा हा राज्यातील पहिलाचा प्रकल्प ठरणार आहे. या रोप वेमुळे माहुर तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासही मोठी मदत होणार आहे.