Mumbai Local Train Update: मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील (Mumbai Local Train) मोक्याचे ठिकाण म्हणजे दादर रेल्वे स्थानक. (Dadar Railway Station) दोन्ही मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळं नेहमीच दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात मात्र आता बदल होणार आहेत. दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरुन प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाने आता एका ओळीत फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. (Dadar Railway Station Platform)


रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर रेल्वे स्थानकातील पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक तेच राहणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक बदलणार आहेत. अलीकडेच, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम रेल्वेपासून एक क्रमांक ते मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत म्हणजेच दादर टर्मिनसच्या फलाटापर्यंत अनुक्रमानुसार रांगेत क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


मोफत थाळीचा मोह पडला ९० हजारांना; एका फेसबुक लिंकमुळं महिला अडकली सायबर चोरट्यांच्या जाळ्यात


दादर रेल्वे स्थानकात बदल


रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीनुसार पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम रेल्वेचे फलाट १ ते ७ पर्यंत तसेच राहणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या धीमा मार्गावरील पहिला फलाट आता आठ क्रमांकाचा असेल. व त्यानुसारच इतर फलाटांचे क्रमांक बदलण्यात येतील. दादर टर्मनसमधील फलाट क्रमांकही याचनुसार असणार आहेत. 


मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक आता आठ पासून सुरू होणार आहे. त्यामुळं टर्मिनसचा फलाट क्रमांक आता १५ असणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तसं स्पष्ट केलं आहे. लवकरच स्थानकात तसे बदल करण्यात येतील, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


नाशिकः संपूर्ण शरीर फ्रॅक्चर, खेळताना पिठाच्या गिरणीत पडला, तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू


प्रवाशांना सूचना देणार 


दादर रेल्वे स्थानकात झालेल्या या बदलाबाबत प्रवाशांना माहिती व्हावी यासाठी बदललेल्या फलाट क्रमांकासह सूचना स्थानकात वारंवार करता येतील. तसंच, आधीच्या घोषणांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पादचारी पूल आणि दिशादर्शक फलकांवरील क्रमांकही बदलण्यात येतील व नव्याने त्यावर क्रमांक टाकण्यात येतील, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, दादर रेल्वे स्थानकात झालेल्या या बदलांमुळं प्रवाशांचा कोणताही गोंधळ उडणार नाही व त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येईल, असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं आहे.  


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 


कुर्ला आणि भांडूपदरम्यान मध्य रेल्वेवर आज शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.