Navi Mumbai News:  खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी कोपरा पूल हा महत्त्वाचा ठरतो.  मात्र हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यामुळं या परिसरात वाहतूककोंडीची समस्या कायमची होऊन बसली आहे. आता सिडकोने वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचचले आहे. जीर्ण झालेल्या पुलाला पर्याय म्हणून सिडको आणखी एक पूल बांधत आहे. सात मीटर रुंदीचा हा पूल असून या पुलामुळं खारघरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी कोपरा येथील मार्ग सोयीस्कर ठरतो. मात्र, खारघरमधून बाहेर पडण्यासाठी वापर करण्यात येणारा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता.  सध्या एकेरी मार्ग सुरू आहे. त्यामुळं  वाहतुककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी हिरानंदानी येथून मुख्य प्रवेशाचा रस्ता आहे, याशिवाय पुढे आल्यानंतर कोपरा गावाजवळून खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी नाल्यावर अरुंद पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील एक पूल जीर्ण झाला असल्याने धोकादायक झाला आहे. 


आता सिडकोने या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सिडको या ठिकाणी नवीन पुल बांधत आहेत. या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. हा पुल थेट शीव-पनवेल सागरी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. दरम्यान, कोपरा पुलावर कायमस्वरुपी मोठा पूल नियोजित आहे. मात्र, पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमुळं यात अडथळा येत आहे. त्यामुळं या पुलाचे काम रखडले आहे. 


रांजणपाडा, ओवे, कोपरा गावातील रहिवाशांसाठी हा पूल सोयीचा आहे. मात्र धोकादायक पूल बंद केल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. नागरिकांना पनवेलकडे जाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतराचा फेरा मारुन सायन-पनवेल माहामार्गाला जावे लागते. तर, अवघ्या काही सेकंदाचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना बराच काळ वाहतुककोंडीत अडकावे लागते. पण आता सिडकोने यावर तोडगा काढला आहे. 


या मार्गावरील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने पुलाच्या स्वरुपाने तात्पुरता पर्याय काढला आहे. मुंबईकडे जाण्यासाठी कोपरा पुल हा एकमेव पर्याय असल्याने वाहनचालकांना नाइलाजस्तव विरुद्ध दिशेने वाहन चालवावी लागतात. मुंबईकडे जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग सिडकोने तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.