Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले होते. (Maharashtra Politics) आता तर शिवसेनेने कामांच्या यादीतूनच फडवणीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Political)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांबद्दल (Farmer) दिलेल्या दोन प्रतिक्रियांचे व्हिडिओ फडणवीसांनी ट्विट केलाय. या व्हिडिओसोबत काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केले होते. फडणवीसांनी महावितरणच पत्रही ट्विट केलं आहे. त्यामध्ये जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेनेनही ट्टिटरवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. केवळ उद्धव ठाकरेंचे जुने व्हिडिओ ट्विट करून वीजबिल माफीचा प्रश्न सुटत नाही, असा टोला शिवसेनेनं लगावलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोणती कामं केली याची यादीच शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आलीय. 


उद्धव ठाकरे यांची काल विदर्भातील बुलडाण्यात सभा झाली. या सभेतून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज्यपाल, कर्नाटकडून येणा-या धमक्या या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची वीजबिल माफी करूनच दाखवावी, असं आव्हान त्यांनी दिले आहे. शिंदेवरही जोरदार टीका केली.  


बुलडाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडली. भावना गवळी आणि अब्दुल सत्तारांसह उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जहरी टीका केली. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते जनतेचं भविष्य काय घडवणार असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शेतक-यांचं वीजबिल माफ करून दाखवाच  असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले होते.  बुलडाणा जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिलंय.