Republic Day : दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, राज्यात अलर्ट
Attack Alert : प्रजासत्ताक दिन (Republic Day) सोहळ्यादरम्यान आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. (Terrorist Attack Alert) 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी मोठा हल्ला करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Terrorist Attack Alert : प्रजासत्ताक दिन (Republic Day) अगदी दोन दिवसांवर आला आहे. मात्र यावर्षी या सोहळ्यादरम्यान आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. (Terrorist Attack Alert) 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra News in Marathi)
या संघटनांकडून मोठा धोका
देशात G20 परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, आयसीसशी संबंधित संघटना अकीस, जमात उल मुजाहिदीन या संघटना हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची साथ आहे, अशी माहिती समोर येत आहे.
G20 परिषदेसह हे अधिकारी टार्गेटवर
देशातले बडे राजकीय नेते, सैन्यदलं, पोलीस अधिकारी हे टार्गेटवर आहेत. आयईडी, ड्रोन यांद्वारे सैन्यदलं, पोलिसांच्या वाहनांवर हल्ल्यांची शक्यता आहे. तसेच परदेशी नागरिकांना लक्ष्य करुन G20 परिषदेत खोडा घालण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. हल्ला नेमका कशाप्रकारे होईल याची माहिती सुरक्षा यंत्रणा अजमावत आहेत.