नागपूर विभागातील जलाशये कोरडीच
सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यावर पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना लागला तरीही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या जलाशयामध्ये २२ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ५३ टक्के इतका जलसाठा उपलब्ध होता.
जितेंद्र शिंगाडे, नागपूर : सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यावर पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना लागला तरीही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या जलाशयामध्ये २२ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ५३ टक्के इतका जलसाठा उपलब्ध होता.
- नागपूर विभागात एकूण १८ मोठे जलाशय प्रकल्प
- एकूण क्षमता २९६४.४ दशलक्ष घनमीटर
- आतापर्यंत ६४८ दशलक्ष घनमीटर साठा (२२ टक्के)
- १३ मध्यम प्रकल्प (नागपूर विभाग)
- एकूण क्षमता २००.६ दलघमी
- आजच्या घडीला ३९.२१ दलघमी (२० टक्के)
खरीप पिकासाठी पाण्याची आवश्यकता
पेरण्या झालेल्या आहेत
रोवणी रखडलेल्या आहेत
संपूर्ण विदर्भात पावसाची २० टक्के तुट
साधारणतः ५०२.४ मिलीमीटर पाऊस पडतो
आतापर्यंत ४००.९ मिलीमीटर पावसाची नोंद
विदर्भातील जिल्ह्यातील पावसाची तुट (टक्क्यांमध्ये)
नागपूर - २२ टक्के
भंडारा - २७
गोंदिया - २९
गडचिरोली - १३
चंद्रपूर - २४
यवतमाळ - २८
वर्धा - ७
अमरावती - २८
अकोला - २३
वाशीम - १२
बुलढाणा - ६ टक्के