पालघर : वसई-विरार शहरातल्या नागरिकांना आज सकाळी सकाळी मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या रिक्षाचालकांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर जिल्ह्यातल्या तीन आणि सहा आसनी रिक्षा आज बंद आहेत. त्यामुळे कामावर निघालेल्या नागरिकांना पायपीट करत स्टेशन गाठावं लागतंय. 1 नोव्हेंबरपासून सर्व रिक्षा, टेम्पोच्या पासिंगसाठी कल्याणला जावं लागतं. 


पालघर जिल्हा स्थापन होऊन 3 वर्ष उलटली तरी आरटीओ कार्यालय स्थापन न केल्यानं शिवसेना पुरस्कृत संघटनांनानी पुकारला बंद पुकारला आहे. 


आरटीओ पासिंगसाठी रिक्षा चालकांना पहाटे अडीच वाजता निघून राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणय. या बंद मध्ये मालवाहू रिक्षाचालकही सहभागी झाल्याने बाजारपेठ आणि इतर व्यहार ठप्प  झालेत.