नवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली असून, यामुळं अनेक गणितंही बदलण्याची चिन्हं आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचे सिडकोचे अधिकार संपुष्टात, जमीनमालक म्हणून असणारे अधिकार मात्र अबाधित असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नियोजन प्राधिकरणाचे सिडकोचे अधिकार आता संपुष्टात आले आहेत. या संदर्भात नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार नवनगर विकास प्राधिकारण म्हणून सिडकोचे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकासकार्य पूर्ण झाले आहे. 


आता जमीनमालक वगळता येथे अन्य कोणतीही जबाबदारी सिडकोने पार पाडणे अपेक्षित नसल्याने या क्षेत्रातील सिडकोचे अधिकार संपुष्टात आणत असल्याचं नगरविकास विभागाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आरक्षणाच्या प्रस्तावात नगरविकास विभागाने केलेल्या सूचनांनुसार बदल करून प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचे निर्देश नवी मुंबई पालिका आयुक्तांना दिलेत.