लातूर : काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका. आज तुमच्या हातात मोबाईल आहे, तोही काँग्रेसने दिलाय. तुम्ही आज जे संगणक, लॅपटॉप वापरतायत ते काँग्रेसने दिले आहे, असे सडेतोड उत्तर भाजपला अभिनेता रितेश देशमुख याने लातूरमधील जाहीर सभेत दिले. त्याचवेळी रितेशने २०१४च्या आधी काय झालं ते बघा, भक्तांनो! असे रोखठोक भूमिका घेत रितेश आपल्या शैलीत फटकाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही, एक हृदय लागते. चांगलं मन लागते. ५६ इंचाची छाती म्हणजे केवढी असेल, असा मी विचार करत होता. ५६ इंचाचे तर गोदरेजचं कपाट असते, तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही टेप घेऊन त्याचे मोजमाप करु शकता, अशा शब्दात रितेश देशमुख याने लातूरमधील सभेत फटेकबाजी केली. लातूरमधील काँग्रेसच्या सभेत त्याने आपल्या खुमसदार शैलीत भाजपचा समाचार घेतला.  



तरीही तुम्ही विचारता की काँग्रेसने काय दिले? मोठा गर्व आहे त्यांना की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे ते पहिले पंतप्रधान आहेत. अहो पण भारताला जे स्वातंत्र्य मिळालेय, ती देखील काँग्रेसचीच देन आहे. एवढे लक्षात ठेवा. मला प्रियंका गांधी यांचे एक वाक्य आठवते. देश चालवायला ५६ इंचांची छाती लागत नाही. तर एक हृदय लागते. चांगलं मन लागते, असे रितेश देशमुखने यावेळी म्हणाला.


लातूर मतदारसंघातून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत निवडणूक रिंगणात आहेत. दुसरीकडे भाजपने सुधाकर भालेराव यांना उमेदवारी देऊ केली आहे. लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघ हा २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, २०१४ मध्ये भाजपचे सुनील गायकवाड हे लोकसभेवर निवडून गेले होते. यावेळी त्यांचे भाजपचे तिकीट कापलेय.