मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने अमित देशमुख आणि धीरज देशमुख या त्याच्या दोन्ही भावांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या दमदार विजयानंतर भावनिक ट्विट केलं आहे. ट्विट करत त्याने लातूरच्या जनतेचे आभारही मानले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशने दोन्ही भावांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही संपूर्ण परिवारासह उपस्थिती लावली होती. तसंच निवडणूकीपूर्वी अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठीही रितेश संपूर्ण परिवारासह हजर होता.



लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होत विजयाची हॅट्रिक केली आहे. भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा ४२ हजार ५० मतांनी पराभव अमित देशमुख यांनी काँग्रेसचा गड कायम राखला आहे. 


२००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा अमित देशमुख निवडून आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काही काळ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. आता तिसऱ्यांदा ते विधानसभेच्या आखाड्यात उतरुन विजयी ठरले आहेत.


  


तर दुसरीकडे धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. धीरज देशमुख १ लाख ३४ हजार ६१५ मतांनी विजयी झाले आहेत. 


लंडमधून धीरज देशमुख यांनी एमबीए केले आहे. लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून २०१३ पासून धीरज राजकारणात सक्रिय झाले आहेत.