शाब्बास सुनबाई! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट कोल्हापुरात
ऋतुजा लटके यांच सासर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी येथे आहे. यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट त्यांच्या सासरवाडीत म्हणजेच कोल्हापुरात देखील साजरा करण्यात आला.
प्रताप नाईक, झी मिडिया, कोल्हापूर : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या(Shiv Sena emerged as Balasaheb Thackeray group) आणि महविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)उमेदवार ऋतुजा लटके(Rutuja Latke) विजयी झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांच सासर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी येथे आहे. यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट त्यांच्या सासरवाडीत म्हणजेच कोल्हापुरात देखील साजरा करण्यात आला (Maharashtra Politics).
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच शाहूवाडी तालुक्यातील सरुड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, येळवणजुगाई, शेंबवणे आदी परिसरातील लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. मूळच्या शाहूवाडी तालुक्यातील ऋतुजा लटके यांच्या विजयाने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहूवाडीत जल्लोष
अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे मूळ गाव हे शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाने येथे पोटनिवडणुक लागली आणि या पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच राजकीय लढाई चांगलीच चर्चेत आली होती. सुरुवातीला भाजपने ही आपला उमेदवार या ठिकाणी दिला. मात्र, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला.
यामुळे ऋतुजा लटके आणि अपक्ष उमेदवार असा सामना लढला गेला. या नंतर आज निकाल जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर शाहूवाडी या परिसरात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला.
बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा मोठा प्रभाव
दिवंगत रमेश लटके यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा मोठा प्रभाव होता. यामुळे सेनेचा भगवा त्यांनी आपल्या हाती घेतला होता.
रमेश लटके यांनी 2000 मध्ये माजी आ संजीवनीदेवी गायकवाड व बाबासाहेब पाटील - सरुडकर यांच्या विरोधात सेनेच्या उमेदवारीवर शाहूवाडी विधानसभेची पोटनिवडणूकही लढवली होती. परंतू या निवडणूकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान गेल्या 20 वर्षात शिवसेनेत झालेल्या अनेक बंडानंतरही लटके कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहे. मात्र, ग्रामीण भागातील एक युवक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन रमेश लटकेंच्या रूपान आमदार झाला.
दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि आमचा वाघ हरपला अशी भावना त्यांच्या मूळ धुमवाडी गावातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. आज आमच्या गावची सून आमदार झाली असे म्हणत खऱ्या अर्थाने धुमकवाडीकरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाहायला मिळत होते.