नंदुरबार : देशभरात राबवला जाणारा केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्प कधीही यशस्वी होणार नाही असा दावा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंगांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या वर्षाचा वेग कौतुकास्पद होता. मात्र त्या कामांमध्ये ठेकेदारची संख्या वाढल्यानं कामाचा वेग मंदावल्याचा टोला त्यांनी लगावलाय. 


छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या आवारात आयोजित जलसाक्षरता परिषदेत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिलं. यावेळी उपस्थितांना पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात आला.