COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : सुरक्षा रक्षकाचा खून करून पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुदेव नगरमधील मुस्तफा हसन यांच्या मालकीचा 'पंचशील ऑटोमोबाईल' नावानं पेट्रोल पंप आहे. या पेट्रोलपंपवर ७५ वर्षीय नूर खान हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे कर्मचारी पेट्रोल पंप उघडण्यासाठी आल्यावर केबिनमध्ये त्यांना नूर खान यांचा मृतदेह दिसला. तसंच लॉकरमध्ये ठेवलेल्या सुमारे १३ लाख रुपयांची रक्कमही चोरून नेण्यात आली होती.


बँकांना सलग सुट्टी असल्यानं एवढी मोठी रक्कम पंपावर ठेवण्यात आली होती. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही रेकॉर्डकरही काढून नेलाय. 


दाट लोकवस्ती आणि गजबजलेल्या भागातील पेट्रोल पंपावर पडलेल्या या दरोडा आणि खुनामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झालेत.