नागपूर : गोरक्षकांच्या नावावर हिंसा होता कामा नये. हिंसा  करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रोहिंग्याना देशात आश्रय देता कामा नये, असे परखत मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी रोहिंग्यांपासून देशाला धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरील विजया दशमी मेळाव्याला संबोधित करताना भागवत यांनी हा इशारा दिला. याप्रसंगी भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी मुंबईकरांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं म्हणत मुंबईतील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.



रोहिंग्यांचे आणि भारताचे नाते काय? असा सवाल करतानाच रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास रोजगाराच्या समस्या तर निर्माण होतीलच. रोहिंग्याना भारतात आश्रय देण्यास विरोध दर्शविला. परकियांशी मानवेतने वागून आपल्या देशातील जनतेशी प्रतारणा करता येणार नाही. घुसखोरीला रोखणे ही काळाची गरज आहे. पण तसं होताना दिसत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.


दरम्यान, गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड झाला पाहिजे. गायींना वाचवण्यासाठी हिंसा करणाऱ्यांचे समर्थन होवू शकत नाही. तसेच भावत यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली पाहिजे. शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान मिळायला हवे. शेतकऱ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. कुठलेही तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या आधी त्यावर विचार व्हायला हवा. कमी खर्चात शेती करता प्रयत्न हवे आणि शेती करत जोड धंदा हवा. त्याचबरोबर उत्पादन खर्चावर शेतकऱ्याला भाव मिळायला हवा, असे भागवत म्हणालेत.