Nilesh Lanke Meet Gaja Marne : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोव-यात सापडले आहे. पुण्यातील गुंड गजा मारणेची लंकेंनी भेट घेतली. यावेळी गुंड गजा मारणेनं लंकेंचा सत्कार देखील केला. सत्कार करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्चुळाच खळबळ उडाली आहे.  निलेश लंके गजा मारणे भेटीवर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांनाच अजब सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं असं रोहित पवार यांनी म्हंटल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश लंकेंनी चुकून तेथे गेलो हे सांगितल आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. मी देखील या प्रकाराबाबत माफी मागतो असं रोहित पवार म्हणालेत. तसंच कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं आणि याबाबत कुणीही राजकारण करू नये असं आवाहनही रोहित पवारांनी केले आहे.


पार्थ पवार यांनीही घेतली होती मारणेची भेट 


लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी खूप टीका झाली होती. त्यानंतर चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होतं. सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत कदाचित निलेश लंके गजा मारणेंकडे आभार मानायला गेले असतील असा आरोप अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी केलाय..तर ते घर गजा मारणेचं आहे हे माहित नव्हतं असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिले आहे. निलेश लंके गजा मारणेंकडे आभार मानायला गेले असतील असा आरोप अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी केला आहे. 


कोण आहे गजानन मारणे?


गजानन मारणे उर्फ गरजा मारणे हा मुळशी पॅटर्नचा प्रोडक्ट आहे. तो मारणे गॅँगचा म्होरक्या आहे.  खून, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आतापर्यंत जवळजवळ 25 गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे.  मोक्कांतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे.  गजा मारण्याचे विविध पक्षांच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे देखील अनेकदा उघडकीस आले आहे.