रत्नागिरी : शहरात एक धक्कादायक घटना घडली. पाळीव कुत्र्याला खाणे देणे कामगाराच्या जीवावर बेतले आहे. Rottweiler या जातीच्या कुत्र्याला खाणे  देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्याने स्वतःचे सावज केले. (Rottweiler Dog Attack on workers in Ratnagiri) या दुदैवी घटनेत ५५ वर्षीय कामगाराचा (worker) जागीच मृत्यू (Death ) झाला. दिवाकर पाटील असे या कामगाराच नावे आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) माजी उपनगराध्यक्ष बाळ मयेकर यांच्या घरात ही दुदैवी घटना घडली. बाळ मयेकर यांच्या घरात त्यांनी रॉटव्हीलर जातीचा कुत्रा (Rottweiler Dog)  पाळला आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाकर पाटील हे गेल्या काही वर्षापासून बाळ मयेकर यांच्याकडे कामाला आहेत. काल सकाळी दिवाकर पाटील हे कुत्र्याला खाणे घालण्यासाठी  गेले होते. यावेळी रॉटव्हीलर (Rottweiler) कुत्र्यांने दिवाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, दिवाकर पाटील यांचे कुत्र्यांने लचके तोडले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुत्र्या त्यांच्यावर तुटून पडला होता. हा कुत्रा ताकदवान असल्याने त्याला आवरता येत नव्हते. त्यामुळे दिवाकर पाटील यांना कुत्र्याच्या हल्ल्यातून सोडवता येत नव्हते. 


दरम्यान, या कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी वनविभागासह प्राणी मित्रांची मदत घेतली. कुत्र्याला बेशुद्ध करून पाटील यांची सुटका करण्यात आली.  मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिवाकर पाटील यांचा मदतीआधीच मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद  रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी दिली.


रॉटव्हीलर


रॉटव्हीलर ही पाळीव कुत्राची एक जात आहे. ते ताकदवान असतात. ते मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. जर्मनमध्ये या रॉटव्हीलरला मेटझरहंड म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ रॉटव्हीलर कसाईचे कुत्रे होते. कारण त्यांचा मुख्य उपयोग कळपातील जनावरे आणि कच्च्या मांसाने भरलेल्या गाड्या बाजारात आणण्यासाठी केला जातो.