पिंपरी-चिंचवड : अॅक्सिस बँकेचे ७४ लाख रूपये पळवल्याची धक्कादायक घटना घडलीय. 


चालकानं व्हॅन पळवून नेली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅक्सिस बँकेच्या पिंपळे-सौदागर शाखेतल्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकेची व्हॅन घेऊन चालक आणि इतर तीन सहकारी आले होते. व्हॅन एटीएमजवळ आल्यानंतर इतर तीन सहकारी खाली उतरताच चालकानं व्हॅन पळवून नेली. 


व्हॅनमध्ये ७४ लाखांची कॅश 


रणजीत कोरेकर असं पैसे लुटून नेणाऱ्या चालकाचं नाव आहे. या व्हॅनमध्ये ७४ लाख रुपयांची कॅश होती. या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.