नागपूर  :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 मे रोजी सुरू झालेल्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप 2 जूनला रेशीमबाग मैदानावर होणार आहे. यंदा 735 स्वयंसेवक शिक्षार्थी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात सहभागी झाले. यावेळी भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे दाजी उपाख्य कमलेशजी पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मात्र सर्वांचे लक्ष राहील ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाकडे!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसंघचालक विजयादशमी आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समारोपला स्वयंसेवकांना संबोधित करतात. त्यादृष्टीने संघ शिक्षा समारोपाला सरसंघचालकांचे उद्बोधन याकडे जगभरातील स्वयंसेवकांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. संघ स्थापनेनंतर 1927 मध्ये नागपुरातील महाल परिसरातील मोहिते वाडा संघ मुख्यालय पहिला संघ शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर नियमित संघ शिक्षक वर्गाचे आयोजन होते आहे.


1948 आणि 1970 शिक्षकवर्ग झाला नाही. त्यानंतर कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग झाला नाही. यंदा मात्र साक्षीत 735 तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात सहभागी झाले होते. 


संघ शिक्षार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, सेवा यांच्यासह विविध विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गासाठी शेतकरी, शिक्षक, अभियंता आणि अगदी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह देशभरातून 735 शिक्षार्थी सहभागी होते. 


त्यातील विविध प्रांतातून आलेले शिक्षार्थी वेगवेगळ्या क्षेत्राशी आणि व्यवसायाची संबंधित आहे. 


163  प्रचारक . 


108 नोकरदार  


103 शिक्षक


57  विद्यार्थी


47 शेतकरी


45 लघु व्यावसायिक,


31 वकील,


25 अभियंता,


23 कामगार,


17 प्राध्यापक,


14 लघु उद्योजक,


5 वैद्यकीय तज्ज्ञ 


यांचा तृतीय वर्ष वर्गात प्रामुख्याने समावेश आहे.