अकोला : काँगेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीच्या चर्चानी आता पुन्हा जोर धरला आहे. याला कारण आहे ते म्हणजे राज्यसभेची निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँगेसला बहुजन वंचित आघाडीची मदत लागणार आहे. यासाठी राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला अशा बातम्या पुढे आल्या. 


मात्र, यात काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले आहे.


निवडणूक जवळ आली की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून त्यांनी या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. 


तसेच, राज्यसभेवर पाठविण्यासाठी काँगेसकडे केवळ एकच जागा आहे. असे असताना काँगेस आपली जागा वंचित बहुजन आघाडीची का देईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला.