अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बाजारात विकली जाणारी अंडी प्लास्टिकची असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून येत आहेत. मात्र हा केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेला अपप्रचार आहे. कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत असा खुलासा नॅशनल एगज कॉर्डीनेशन कमिटीनं केला. त्यासाठी त्यांनी एक डेमोही दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठलंही अंड फोडलं की त्याच्या आत कवचाला चिकटलेला एक पापुद्रा असतो. हा पापुद्रा अगदी अलगदपणे कवचापासून वेगळा करता येतो. अंड शिळं असल्यास हाच पापुद्रा प्लास्टिक सारखा वाटतो. आणि आपल्याला ते अंड प्लास्टिकच असल्याचं वाटतं. प्रत्यक्षात ते खोटं आहे हे पटवून देण्यासाठी एक चाचणी आहे. अंड्याचा हा पापुद्रा ज्वालांवर पकडला तरी तो सहजी जळत नाही. याउलट प्लास्टिक लगेच पेट घेते. त्यामुळे प्लास्टिकचं अंड ही केवळ अफवा आहे.


प्लास्टिक अंड्याच्या अफवांमुळे अंडी उत्पादक आणि ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. मुंबई आणि ठाणे विभागात प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जातायंत. हे सगळं थांबवण्यासाठी एनइसीसीने पुढाकार घेतला आहे.