रुपाली पाटील यांची केतकीला चपराक, म्हणाल्या... `चार चापटा मारल्या की... `
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपाचं सत्र दिवसेंदिवस वाढतचं आहे. पण, आता चक्क महिला नेत्यानेचं त्या वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या मराठी अभिनेत्रीला पाच सहा चापट मारायला हव्यात असं म्हटलंय.
पुणे : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitale ) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मिडियावर केतकी हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. केतकीने वकील नितीन भावे ( ADV. Nitin Bhave ) यांची एक कविता पोस्ट केली आहे.
केतकीने केलेल्या या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिला टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके ( Swapnil Netke ) यांनी कळवा पोलीस ठाण्यात ( Kalva Police Thane ) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केतकीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर, मनसे सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील - ठोंबरे ( Rupali patil - Thombare ) यांनी खरमरीत शब्दांत केतकीवर टीका केली आहे. 'केतकी बाई टुकार अभिनेत्री, हिला जशास तसे उत्तर देऊन तिची लायकी दाखवुनच देऊ. छडी लागे छम, बुद्धी येई घम घम, केतकी काय होतीस ग तू ,अशी कशी वेडी झालीस तू' अशी केतकीच्या नंबरसह पोस्ट करत रुपाली पाटील यांनी तिला खरी-खोटी सुनावली आहे.
केतकीचे वय काय? आपण कोणाविषयी बोलतोय? टीका करताना ब्राम्हण, मराठा, हिंदू मुस्लीम या गोष्टी आणायच्या आणि 'मन की बात' बोलून समाजाचे स्वास्थ बिघडवण्याचे काम केले जात आहे. तिचे आई-वडील संस्कार द्यायला कमी पडले म्हणून ही वेळ आली आहे. आता तिला छडी लागली की अक्कल येईल, असा टोलाही रुपाली पाटील यांनी लगावला आहे.