औरंगाबाद : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. तर राज्यात कोरोना रूग्णांची संख्या ३७ झाली. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, औरंगाबादेमध्ये आढळलेल्या कोरोना रूग्णाबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाग्रस्त महिला ३ मार्चला रशियाहून दिल्ली विमानतळावर उतरली होती. महिला तब्बल सहा तास विमानतळावर वेटीगं रूम होती, शिवाय तिच्या सोबत दोन मैत्रिणी देखील होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेत आल्यावर या महिलेच्या संपर्कात अनेक जण आले. संपर्कात आलेल्या ५०० जणांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतलाय. 


सिद्धार्थ उद्यान आज दुपारपासून बंद राहणार आहे. उद्यानात होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं हा निर्णय घेतला. हे उद्यान ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी अनेक महत्त्वाचे पाऊलं उचलण्यात येत आहेत. 


रुग्णांची संख्या ३७ वर 
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३७ वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.