कोल्हापूर : घटस्थापनेदिवशी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती संघटनेची' स्थापना होणार आहे. कोल्हापूरात शेतकरी मेळाव्यात या नव्या संघटनेची स्थापना केली जाणार आहे.


आमच्या नव्या संघटनेचे कार्यकर्ते हे आरोग्यदूत, जलदुत, स्वच्छतादूत बनून कार्य करणार आहेत. आत्महत्यांच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम संघटना करणार आहे.