सदाभाऊ खोतांची महाडिकांशी बंद खोलीत चर्चा
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भेटी गाठी सुरु केल्यात.
कोल्हापूर : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भेटी गाठी सुरु केल्यात.
सदाभाऊ खोत आज कोल्हापूर जिल्हा दौ-यावर आहेत. आज सकाळी सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणारे काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजाराम साखर कारखान्यावर जावून भेट घेतली.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार महादेवराव महाडीक हे आपले जुने स्नेही असल्यामुळं त्याची भेट घेतल्याचं स्पष्ट केलय.