Sai Baba Shirdi Gurupaurnima Utsav 2024 : शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. अनेक साईभक्त पायी चालत शिर्डीला जातात. गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे साईभक्तांवर शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण तालुक्यातील टिटवाळा भागातील तीन साई भक्तांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही साईभक्त गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त टिटवाळाच्या मांडा टिटवाळा येथून पायी जाणाऱ्या शिर्डी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.  मात्र ही पदयात्रा सिन्नर नजीक येताच एका चार चाकी वाहनाने या तिघांना धडक दिली आणि त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर ते तिघे राहत असलेल्या ठिकाणी शोककळा पसरली आहे. भावेश पाटील, रविंद्र पाटील,साईराज भोईर यांचा अपघातात मुत्यू झाला, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी चालकाचा तपास सुरू केला आहे. वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतांच्या कुटुंबायांनी केली आहे. 


विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू


आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या हिंगोलीच्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोडाळा येथील 70 वर्षीय रामराव रहाटे हे वारकरी वारी निमित्त पंढरपूरला गेले होते. दर्शन करून बसने ते सकाळी पंढरपूर रिसोड बसने सेनगावकडे परत निघाले होते. दहा तासांचा प्रवास करून त्यांची एसटी ते अर्ध्या तासात सेनगाव बसस्थानकात पोहोचणार होती. सेनगाव तालुक्यातील भानखेडा परिसरात बस पोहोचली असता रहाटे यांना एसटी मध्येच हृदय विकाराच झटका आला आणि बसमध्येच त्यांचा मृत्यू झालाय.