Sai Resort Demolition Stay Order : दापोलीतील साई रिसॉर्ट (Sai Resort) तोडकामास स्थगिती देण्यात आलीय. पण, साई रिसॉर्टच्या बाजूला असलेलं सी कौंच रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात झालीय...भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) उपस्थितीत सी कौंच रिसॉर्ट पाडकामास सुरुवात झाली. दोन्ही रिसॉर्ट 40 ते 50 दिवसांत पाडले जाणार असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याची ऑर्डर अदयाप आलेला नाही. सरकारी जमिनीवर अनिल परब (Anil Parab) आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांनी कब्जा केलाय. या जमिनिवर आम्ही हातोडा मारला अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांचा आरोप
दापोली इथल्या साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांनी 2018 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात रिसॉर्टचा उल्लेख केला होता. या रिसॉर्टची घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. 


अनिल परब यांचं आव्हान
तर साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय. सोमय्यांकडून जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप परबांनी केलाय. सोमय्यांविरोधात फौजदारी दावा दाखल करणार असल्याचं परबांनी म्हटलंय. नारायण राणे, सुभाष देशमुखांच्या बंगल्यावर सोमय्या हातोडा कधी चालवणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय..


सोमय्या हातोडा घेवून केवळ नौंटकी करतायत, कोर्टाने जैसे थे स्थिती ठेवायला सांगितली आहे. गेले दोन दिवस टीव्हीवर बातम्या चालवतायत कि अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा पडणार, पण मी वारंवार सांगितलं कि रिसॉर्टची मालकी माझी नसून सदानंद परब यांची मालकी आहे, जाणूनबुजून किरीट सोमया माझी बदनामी करतायत असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 


कोर्टाने जैसे थे स्थिती ठेवायला सांगितली आहे. जाणूनबुजून मला त्रास देण्याचं काम सुरूय आहे. सरकारमध्ये असताना सरकारला त्रास दिला जात होता, आता मला त्रास दिला जातोय असा आरोप अनिल परब यांनी केलाय.  ज्यांच्यावर आरोप होते ते शिंदे गटात गेले. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याकडे हातोडा घेऊन सोमय्या जात नाहीत, जाणूनबुजून खोट्या तक्रारी केल्या जातायत अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल केलाय, आता फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय.