पुणे : दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा महापालिका आवारात बसवण्याचा प्रयत्न हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी मनपाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहेत. तर दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा महापालिका आवारात बसवण्याचा प्रयत्न हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय. 


पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिराची वास्तू पाडण्यास शिवसेनेचाही विरोध आहे. त्यासाठी बालगंधर्व रंग मंदिराबाहेर शिवसेनेच्यावतीने सह्यांची मोहीम घेण्यात आली. ज्येष्ठ तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनीही या सह्यान्च्या मोहिमेत भाग घेतला. स्वतः सही करून त्यांनी बालगंधर्व रंग मंदीर पाडून त्याजागी नवीन वास्तू उभारण्यास विरोध दर्शवला.