पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचा आज ३२९ वा बलिदान दिन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निमित्ताने त्यांचं समाधीस्थळ असलेल्या वढू गावात विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जातं. पहाटेपासून कार्यक्रमांना सुरुवात होते. संभाजी महाराजांच्या समाधीला अभिषेक केला जातो. त्यानंतर गावातून मौन फेरी काढली जाते. 


आजही महाराजांना अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यावर्षी या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार आहेत.


बलिदान दिनाच्या औचित्यावर संभाजी राजांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शंभू प्रेमी वढुमध्ये येतात. त्याचप्रमाणे तेथूनच जवळ असलेल्या तुळापूर संभाजी राजांची समाधी आहे. तिथेदेखील विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाते. 


आज या दोन्ही ठिकाणी शंभूभक्त दाखल झाले आहेत. पहाटे समाधीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातून 'मौन-फेरी' काढण्यात आली.