मुंबई : मी मराठा समाजाचा सेवक आहे म्हणून माझी ही खुर्ची समाजाच्या बरोबर पाहिजे असे विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. या बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. वाशीच्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने माथाडी भवन येथे ही बैठक पार पडली. यावेळी संभाजीराजे आणि उदयनराजे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत होत. पण उदयनराजे या बैठकीस अनुपस्थित राहीले. तर संभाजीराजें दोन मिनिंट संवाद साधून खाली उतरले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी ११ ऑक्टोबर २०२० ला आयोजित केलेली एमपीएससीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी तसेच जोपर्यत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस निर्णय होत नाही तोपर्यत राज्य शासनामार्फत  पोलीस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शासकीय  भरती घेऊ नये त्या पुढे ढकलण्यात यावी यावर चर्चा झाली. 


एससीबीसीच्या अंतर्गत  राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण जाहीर केल्याप्रमाने सप्टेंबर २०२० च्या अगोदर शिक्षणामद्ये १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शेजारील राज्य तमिळनाडू आणि केंद्र शासनाच्या सुपर निम्रील प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मराठा समाजासाठी तरतूद करावी हा विषय देखील चर्चेत आला. 



सर्वोच्च न्यायालया मद्ये विविध मराठा संघटनांनी एकत्र  येऊन एकच काँसिल द्यावा आणि पुढे केस चालवावी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात यावी असेही या चर्चेदरम्यान ठरले.