Maharashtra Rain Update : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात 13-14 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. त्यातच आता पावसामुळे अकोल्यात सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे ट्रॅकखालील वाळू सरकल्याने याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माना कुरूमजवळ अकोल्याहून नागपूरला जाणारी मेमो गाडी थांबवण्यात आली आहे. तर, अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकामध्ये उभी आहे. अमरावती-अंबा एक्स्प्रेस सध्या बडनेरा रेल्वे स्थानकात उभी आहे. रेल्वे ट्रॅकखालील वाळू सरकरल्यानं रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. ट्रॅक दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सेवा विस्कळीत


पावसामुळे  नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सेवा विस्कळीत झाली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर माना सेक्शन दरम्यान रेल्वे ट्रॅक खालील वाळू सरकल्याने मुंबई हावडा अपडाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झालेय. अनेक रेल्वे गाड्या डायव्हर्ट करण्यात आले आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्ध स्तरावर रेल्वेचे काम सुरू आहे. 


13-14 जुलैपासून कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढणार


राज्यात 13-14 जुलैपासून कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवलीय. उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.  यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालीय. यंदा प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाल्यानं त्याचा पावसावर परिणाम होण्याची शक्यताय. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही पावसाला जोर असल्याचं दिसून आलेलं नाही.


राज्यात केवळ 29 टक्केच पाणीसाठा शिल्लक 


राज्यावर गंभीर पाणीसंकटाचं सावट आहे. राज्यात केवळ 29 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. 24 जिल्हे सध्या रेडझोनमध्ये आहेत. राज्यात मान्सून स्थिरावल्याला 15 दिवस उलटले तरी धरणात पुरेसं पाणी जमलेलं नाही. जुलैच्या सुरूवातीला पावसाचा जोर होता, मात्र गेल्या आठ दिवसांत पडलेला पाऊस सरासरीपेक्षा फार कमी आहे. सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात वेळ 17 टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना धरणात केवळ 15 टक्के पाणी आहे. विभागवार विचार केला तर नाशिक विभागात 18 टक्केच पाणी शिल्लक आहे. बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने तसंच धरणक्षेत्रात पाऊस न झाल्याने ही स्थिती ओढवलीय. ऐन पावसाळ्यातही शेकडो वाड्या, गावांत टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आलीय.