विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच्या लक्ष्मी बकाल या मुलीनं घरच्या परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परिक्षेत ९३.६० टक्के गुण मिळवले आहे, महापालिकेच्या औरंगाबादेतील शाळांमधून ती प्रथम आली आहे, वडिलांचे छत्र लहानपणीच गमावलेल्या लक्ष्मीनं शेतकरी आईच्या कष्टाचं चिजं केलंय. लक्ष्मीच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण आतापर्यंतच्या त्यांच्या पिढ्यांत दहावीच्या परीक्षेत लक्ष्मी इतके मार्क कुणीही मिळवलेले नाहीत. लक्ष्मी बकाल औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरात राहते. घराजवळच्याच महापालिका शाळेत ती शिकते. आर्ई, दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ असं तिचं कुटुंब दोन खोल्यांच्या या छोटेखानी घरात राहतं. घरची दोन एकर कोरडवाहू जमीन कसून लक्ष्मीची आई कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकते. धड अभ्यासाला जागा नाही आणि वातावरणही नाही. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करीत लक्ष्मीनं दहावीत ९३.६० टक्के गुण मिळवले. मोठं होऊन डॉक्टर बनून आईनं घेतलेल्या अपार कष्टाचं लक्ष्मीला सार्थक करायचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत तुटपुंजी मिळकत असलेल्या लक्ष्मीच्या आईला आता लक्ष्मीच्या या घवघवीत यशानं आशेचा किरण दाखवलाय. लक्ष्मीच्या यशाचा तिच्या कुटुंबासह सर्वांनाच अभिमान वाटतोय. सावित्रिबाई फुले, महापालिका शाळा


लक्ष्मीला शिकून मोठं व्हायचं आहे. मात्र तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या मदतीची साथ हवी आहे. अशा संवेदनशील साथीनेच लक्ष्मीसारख्या गरीब घरात जन्मलेल्या रत्नांची स्वप्नं पूर्ण होऊ शकणार आहेत. 


संघर्षाला हवी साथ


गुणवंतांच्या संघर्षाला 'झी २४ तास'चा मदतीचा हात


तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा 


संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६


पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 


ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 


लोअर परळ, मुंबई - ४०००१३


ई-मेल : havisaath@gmail.com