COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पतीचं निधन झालेलं... अशा परिस्थितीत पदरात तीन पोरी....त्यातली नंदिता तर जेमतेम दोन वर्षांची... पण तिच्या आईनं तीनही मुलींना खंबीरपणानं शिकवलं, वाढवलं... नंदितानंही आईच्या कष्टांचं सोनं केलंय. सांगलीत राहणारी नंदिता पवार... 'हुशार मुलगी' अशी तिची ओळख... नंदितानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.२० टक्के मिळवलेत. नंदिताच्या वडिलांचं २००६ साली निधन झालं. नंदिता तेव्हा फक्त दोन वर्षांची होती... तीनही मुलींची जबाबदारी आईवर पडली... नंदिताच्या आईनं पतीचाच चहाचा व्यवसाय सुरु ठेवला... घरोघरी जाऊन त्या चहा विकायच्या... पोटाला चिमटे काढून तीनही मुलींना शिकवलं... नंदितानं दहावीत ९९ टक्के मिळवत आईच्या कष्टाचं सोनं केलंय.


नंदिताला याच वर्षी शाळेकडून 'अष्टपैलू विद्यार्थीनी'चा किताब मिळाला... नंदिता उत्तम सायकलपटू आहे, त्याचबरोबर नाटक आणि नृत्य प्रकारातही ती पारंगत आहे. नंदिताला पुढे वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यायचंय... तिला सीए व्हायचंय... तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे... नंदिताला मदत करण्यासाठी पुढे या... तिची स्वप्नं पूर्ण करायला मदत करुया... 


परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...  


तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा


संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६


पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 


ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 


लोअर परळ, मुंबई - ४०००१३


ई-मेल : havisaath@gmail.com