सांगलीतील बड्या अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी
आता पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची सीआयडी चौकशी होणार आहे.
सांगली : सांगलीत पोलीस कोठडीत मारहाण करून अनिकेत कोथळे या आरोपीची हत्या झाली. आता पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची सीआयडी चौकशी होणार आहे.
खासगी डॉक्टरांकडून मृतदेहाची तपासणी
दोन्ही अधिका-यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सीआयडीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीत अनिकेतच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची खाजगी डॉक्टरनं तपासणी केल्याचंही पुढे आलं आहे.
मृतदेहाची विल्हेवाटआधी पैसे मागितले
आरोपी पोलिसांनी स्थानिक दारु धंदेवाल्यांकडून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी पैसे मागितल्याचंही पुढे आलं आहे. अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी एका पीएसआयसह ६ पोलीस अटकेत आहेत.
सांगलीत एकाच प्रकरणाची सध्या चर्चा
या प्रकरणात आणखी काही बडी धेंडे बाहेर येण्याची देखील शक्यता आहे. या प्रकरणात न्याय देण्यासाठी एक दिवस सांगली बंदची हाक देण्यात आली होती, यावेळी लोकांनी कडकडीत बंद तर काढला शिवाय मोर्चाही काढला.