सांगली : सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी आणखी सात पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. घटनेच्या दिवशी जे जे पोलीस शहर पोलीस ठाण्यात हजर होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. ठाणे अंमलदार, अंमलदाराचा मदतनीस, चार गार्ड, वायरलेस ऑपरेटर यांना निलंबित करण्यात आलंय.


अश्लील सीडी प्रकरण दडपण्यासाठी हत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालंय. अश्लील सीडी प्रकरण दडपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकून संपवण्यात आल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकांनी केलाय. 


निलेश खत्री आणि मध्यस्थी गिरिश लोहना


या हत्येमागे व्यापारी निलेश खत्री आणि मध्यस्थी गिरिश लोहना यांचा हात असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. दोन व्यापा-यांसह अन्य दोघांचा या हत्येत हात असल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय. या आरोपांनंतर सांगली पोलिसांनी लकी बॅग दुकानावर छापा मारुन तपासणी केलीय.