सीआयडीतर्फे वाहनं जप्त करण्याची कारवाई
कामटेला पाठीशी घालणा-या वरिष्ठ अधिका-यांवर अजून कारवाई का नाही, झाली यामुळे नागरिक आक्रमक झालेत.
सांगली : सांगलीतील पोलिसांनी अनिकेतच्या खून प्रकरणात गुन्ह्यात वापरलेली तीन वाहनं जप्त केली आहेत. सीआयडीनं ही जप्तीची कारवाई केली असून अनिकेतच्या शरीराचे अवयव डीएनएसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सांगलीकर आक्रमक
एकीकडे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली, तरी कामटेला पाठीशी घालणा-या वरिष्ठ अधिका-यांवर अजून कारवाई का नाही, झाली यामुळे नागरिक आक्रमक झालेत.
तर मुख्य सूत्रधार आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचे पोलीस कोठडीतही नखरे सुरूच असल्याचा आरोपही करण्यात येतोय. घरच्या जेवणाचा डबा देण्यासाठी कामटेकडून दमबाजी सुरू असल्याचं बोललं जातं आहे.