Sangli Black Magic video :  रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : राज्यात अजूनही जादूटोणाचा (Jadu Tonako) विळखा कमी झालेला दिसतं नाही आहे. नळबळी, जादूटोणा, काळी जादूच्या अनेक घटना आजही समोर येतं आहे. राज्याला  (Maharashtra news ) पुन्हा हादरुन सोडणारी एक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात लढा देतं असताना त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर हा लढा त्यांची मुलगी पुढे चालवते आहे. अशातच शाहू महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओसमोर आला आहे. 


संतापजनक व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका हॉस्पिलमधील रुग्णालयावर जादूटोणा करुन उपचार करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयातील आयसीयूतमध्ये उपचार घेत असेलल्या रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्र म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. डॉक्टरांनी त्यांना विरोध केल्या असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. 


कुठे घडला हा प्रकार 


सांगली जिल्ह्यातील (Sangli news) आटपाडीतील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात ही धक्कादाय घटना घडली. मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालत असल्याचे चित्रीकरणमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे. (Sangli Black Magic Mantras Jadu Tonako and witchcraft on patient in ICU video viral on Social media)



असे प्रकार सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहेत. संबंधित लोकांच्यावर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे. दरम्यान संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिसांत निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. 


कोल्हापुरातही अशी एक घटना


कोल्हापुरातही काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. परडीत मुलींचा फोटो ठेऊन त्यावर हळद कुंकू, लिंबूला टोचलेल्या टाचण्या, हिरवं कापड असा उतारा ठेवल्याचा धक्कादायक घडल्याचं पाहायला मिळालं. बालिंगा-पाडळी रस्त्यावर हा जादूटोण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. हा अघोरी प्रकार कुणी केला...? याचा तपास आता पोलीस करत आहेत. पण, वशीकरणासाठी करण्यात आलेल्या या काळ्या जादूच्या घटनेमुळे आता पाडळी खुर्द या गावातील मुलींना धडकी भरली आहे. 


दरम्यान, महाराष्ट्राच्या ज्या भागात ही घटना घडली त्याच कोल्हापुरातून काही रुढींना शह दिला गेला. त्याच कोल्हापुरातून समाजपरिवर्तनाची सुरुवात आणि आंदोलनंही झालं. पण, आज 21 व्या शतकात मात्र कोल्हापूर आणि सांगलीमध्ये  घडलेली घटना आपली मानसिकता कुठे चाललीये हाच प्रश्न उपस्थित करु लागली आहे.