पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत घेतला गळफास
Sangli Husband Sucide: दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.
Sangli Husband Sucide: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने नवऱ्याने स्वत:चे आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील जत शहरात ही घटना घडली. यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करताना नवऱ्याने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग केले. जत शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय एका पतीला आला. त्याने तिच्या अनैतिक संबंधाचे आरोप केले. या घटनेचा त्याने मोठा धसका घेतला आणि स्वत:चे आयुष्य संपवले.
दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली. यानंतर कोळी यांनी स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या प्रकरणी मृत कोळी यांच्या पत्नी आणि सासूसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच केला बनाव
दुसऱ्या एका घटनेत अहमदनगरच्या श्रीरामपूर दरोडा आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला देखील जखमी केले होते, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र आता या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पत्नीनेच पतीची हत्या करत बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली होती. दरोडेखोरांनी पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला होता. दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे बुशराने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांनी घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात अशी माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. नईम पठाण यांस पत्नीने बुशरानेच संपवल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे. पती नईमची हत्या केल्यानंतर बुशराने दरोड्याचा बनाव केला होता. बुशराने नईमला झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर त्याचा साडीने गळा आवळल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.