रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तासगाव तालुक्यात एक अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्री एकमेकांना भेटायला आहे. पण सकाळी प्रियकर परतला, पण प्रेयसीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?
तासगावमध्ये राहणारं अल्पवयीन प्रेमीयुगुल गावाशेजरी असणाऱ्या एका ठिकाणी एकमेकांना भेटायले होते. रात्री बऱ्याच उशिराने दोघंजणं दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत भरपूर अंधार असल्याने तरुणाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्याला लागून असलेल्या विहिरीत त्यांची दुचाकी कोसळली. त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला पण सुमसाम जागा आणि अंधार असल्याने त्यांना कोणाचीच मदत मिळाली नाही. तरुणाला पोहोता येत असल्याने तो विहिरी बाहेर आला. पण तरुणीला पोहोता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झासा. 


सकाळी या तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी भारती विद्यापीट रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली. भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे आणि H.E.R.F रेस्क्यू टीम सांगली महेश कुमारमठ यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबियांना तरुणाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 


हिंगोलीत कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त
दरम्यान, हिंगोलीत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. औंढा नागनात इथं पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना काही लोकांमध्ये आपापसात भांडण सुरु असल्याचं दिसलं. पोलिसांना या लोकांवर संशय आल्याने त्यांच्या बॅग तपाल्या. तर त्या बॅगेत चक्क पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्या. या सर्व नोटा बनावट होत्या. या प्रकरणी पोलिसांननी नऊ जणांना अटक केली आहे. यात एक महिलेचाही समावेश आहे. 


हिंगोलीच्या (Higoli News) औंढा नागनाथ (Aundha Nagnath) पोलिसांना (Higoli Police) बनावट नोटा चलनात (fake currency) आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग करत असताना संशय आल्याने पोलिसांनी तपास करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चौकशी केल्यानंतर तब्बल कोटींपेक्षाही जास्त रकमेच्या बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या टोळीकडून तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत