Sangli farmers Dead body: सध्या दिवस निवडणुकीचे आहेत...प्रचाराचे आणि आश्वासनांचे आहेत... या आश्वासनांच्या जोरावर नेते मंडळी निवडून येतील. दरम्यान जनतेची कामे किती होतील? हे काही आता सांगता येणार नाही. गावागावातील नागरिकांना आजही मुलभूत गरजांसाठी झगडावं लागतंय. याचीच प्रचिती सांगलीत आलीय. एका शेतकऱ्याचा मृतदेह नेण्यासाठी चांगली व्यवस्थाच नसल्याचे दिसून येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीच्या मिरज मतदारसंघातील हे वास्तव आहे. रस्त्या अभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगावे लागल्या आहेत. येथे एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दरम्यान येथील रस्त्याची खूप दुरावस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल दीड किलोमीटर झोळीतून  घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्याच्या नातेवाईकांवर आली.तर काही अंतर ट्रॅक्टरमधून देखील पार करावे लागले. यानंतर एका रुग्णवाहिका मधून शेतकऱ्याचा मृतदेह नेण्यात आला. 


मिरज तालुक्यातल्या वड्डी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील येसूमळा येथे संतोष येसूमाळी या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. येसूमाळी हे रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना विजेच्या धक्का बसला. यातच  त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेनंतर आता तरी हा रस्ता आणि वीजेची समस्या दूर करा, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.