सांगली : आपल्याकडे प्रतिभावान लोकांची कमी नाही. कोण कशापासून काय तयार करेल, याचा नेम नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपल्यातील प्रतिभा आणि टॅलेंट दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याच सोशल मीडियावर दररोज भन्नाट व्हीडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या पठ्ठ्याने 1930 सालच्या मिनी फोर्ड गाडीचं मॉडेल बनवलंय, ते ही अवघ्या 30 हजार रुपयांमध्ये. (sangli garage mechanic ashok awati makes 1930 mini ford van in only 30 thousand ruppes)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिनी फोर्ड गाडीचं मॉडेल बनवणाऱ्या पठ्ठ्याचं नाव आहे अशोक आवटी. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे भंगारातील साहित्य दुचाकीचं इंजिन वापरुन ही गाडी  साकारण्यात आली आहे. या गाडीला तीन गियर आहेत.  ही जुगाडी गाडी एव्हरेजही मस्त देते. ही गाडी एका लीटर पेट्रोलमध्ये 30 किलोमीटर इतकं एव्हरेज देते.



अशोक यांच्याबद्दल थोडक्यात


अशोक मॅकेनिकल कारागिर आहेत. अशोक यांचं  फक्त 8 वी इयेत्तेपर्यंत शिक्षण झालं आहे. आवटी यांचं ट्रॅक्टर आणि दुचाकीचं गॅरेज आहे. माणसामध्ये हुनर असली की तो काहीही करु शकतो, अशोक आवटी हे याचंच उत्तम उदाहरण आहेत.